कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
योजनेबद्दल
विभागाचे नाव
कृषी
विभाग
सारांश
कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील
उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.
उद्देश
:
जेथे
शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक
शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
प्रात्याक्षिके
व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.
धोरण
:
कृषि
यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका
द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे
अनुदान
या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे
यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:
१)
ट्रॅक्टर
२)
पॉवर टिलर
३)
ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
४)
बैल चलित यंत्र/अवजारे
५)
मनुष्य चलित यंत्र/अवजारे
६)
प्रक्रिया संच
७)
काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
८)
फलोत्पादन यंत्र/अवजारे
९)
वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०)
स्वयं चलित यंत्रे
भाडे
तत्वावरील सुविधा केंद्र:
१)
कृषि अवजारे बँकेची स्थापना
२)
उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
*लाभाच्या
माहितीसाठी कृपया सोबतचे प्रपत्र पाहावे.
पात्रता
- · शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
- · शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
- · शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
- · फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
- · कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
- · एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये
ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास
पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील
आवश्यक कागदपत्रे
- · आधार कार्ड
- · ७/१२ उतारा
- · ८ अ दाखला
- · खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- · जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- · स्वयं घोषणापत्र
- · पूर्वसंमती पत्र
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया
1. पोर्टलवर नोंदणी करा:
- महाडीबीटी पोर्टल लिंक: https://mahadbtmahait.gov.in
- आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीचा वापर करून नोंदणी करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा