डहाणू: आज दिनांक ९/४/२०२३ रोजी कोसबाड ढाकपाडा यश कम्प्युटर एज्युकेशन येथे डहाणू विधानसभा आमदार माननीय कॉ.विनोद निकोले यांच्या हस्ते कॉम्प्युटर प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुमारे १०० गरीब गरजू विद्यार्थ्यांना आमदार निधीतून मदत करण्यात आली. तसेच १०० पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात १०,वी १२ वी आणि पदवीधर मुलांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन शिबीर व इतर मदत करण्याचे आश्वासन दिले. आणि आजपासून कॉम्प्यूटर प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सदस्य कॉ.केशव दळवी, कॉ.विजय वाघात. कॉ.राजेश दळवी, कॉ.कमलेश राबड, कॉ.शैलेश कुवरा, कॉ.कल्पेश दळवी, कॉ दीपक कोद्या, कुशाल राऊत , यश कॉम्प्युटर चे श्री प्रविन ढाक सर आणि कीर्ती ढाक, विद्यार्थी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा